Header AD

कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ मृत्यू

 

■५०,७६३ एकूण रुग्ण तर १०१४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,७६३ झाली आहे. यामध्ये १४०७ रुग्ण उपचार घेत असून ४,३४२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३२कल्याण प – ३६डोंबिवली पूर्व ३४,  डोंबिवली प- १८मांडा टिटवाळा – , मोहना – २ तर पिसवली येथील १ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २३ रुग्ण टाटा आमंत्रामधून९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून४ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads