Header AD

ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने महिला सबलीकरण उपक्रम


■हिलांसाठी व्यावसायिक स्वरुपाचे कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण· इंदूर येथे उपक्रमाची सुरुवात, अन्य शहरातही विस्तार होणार टाळेबंदी आणि त्यानंत रही मिळणार साह्य....


मुंबई, 26 नोव्हेंबर, 2020  :  महिला सबलीकरण उपक्रमात आपले योगदान देण्याच्या अनुषंगाने ब्रिजस्टोन इंडियाने पुढाकार घेतला आहे. महिलांनी व्यावसायिक मोटर चालक व्हावे, त्यांना वाहन यंत्रणेची माहिती असावी तसेच एक व्यवसाय म्हणून महिलांनी या क्षेत्राचा विचार करावा म्हणून कंपनीने प्रशिक्षणाचे आयोजन केले. आजवर सुमारे 81 महिलांनी इंदूर शहरात या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. अन्य शहरांत देखील हा उपक्रम राबविण्याची कंपनीची योजना आहे. 

 

एकंदर साडे तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणात ड्रायव्हिंग विषयक कौशल्ये, प्रतिबंधात्मक देखभाल आणि आपतकालीन दुरुस्तीचा समावेश करण्यात आला. त्याशिवाय इंग्रजीत संभाषण, नकाशा वाचन, प्रथमोपचार, स्व-रक्षण यासारखे सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणात समाविष्ट आहेत. महिला विषयक कायदे, मोटर वाहन अधिनियम, विमा कायद्याची माहिती देखील प्रशिक्षण काळात सहभागी उमेदवारांना देण्यात येते. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना कॅब ड्रायव्हर, पर्सनल ड्रायव्हर, ई-रिक्षा ड्रायव्हर आणि कॉलवर उपलब्ध होणारे चालक म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो आहे. 

 

महिला सबलीकरण हे ब्रिजस्टोन इंडियामध्ये आमचा मुख्य भर असलेल्या काही घकांपैकी एक आहे. हा उपक्रम महिलांना वित्तीय स्वातंत्र्य तर देतो, शिवाय त्यांना पारंपरीक रोजगारापलीकडच्या पर्यायांत सहभागी होण्याचा आत्मविश्वास प्रदान करतो. या प्रशिक्षणात ब्रिजस्टोनच्या सुरक्षा आणि दळणवळण विषयक मूल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशात टाळेबंदी झाल्यावर, नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले. आम्ही महिला वर्गाला मदतीचा हात दिला. अनेक महिलांनी जिद्द दाखवलीच, शिवाय मोठ्या हिमतीने नवीन कौशल्य आत्मसात केली,” असे ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले.

टाळेबंदीच्या कालावधीत अनेक महिलांनी नोकऱ्या गमावल्या, त्यावेळी अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत ब्रिजस्टोन इंडिया पुढे सरसावले. एकंदर शंभर कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घेतला. 

इंदूर शहरात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे आणि सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना महिला चालक असल्यास त्यांना सुरक्षित वाटते. मला या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास दिला. मी देखील व्यावसायिक होऊ शकते, कमावू शकते आणि मलाही कुटुंबाला हातभार लावणे शक्य आहे. माझ्या मते कार चालक म्हणून घराबाहेर पडल्याने मला मोठी मदत झाली. कार ड्रायव्हिंगने मला सबला केले.” यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करून सध्या कॅब चालवत असलेल्या सोनाली प्रजापत सांगतात.

 

माहितीचा सारांश: 

टाळेबंदी होण्यापूर्वी सोनाली मुलींच्या वसतीगृहात चालक म्हणून कार्यरत होती. ती दर महिन्याला रु. 7000 कमावत होती. आपल्या पतीपासून फारकत घेऊन सध्या ती इंदूर शहारत राहते. ती कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य आहे. सोनाली आई-वडील आणि भावाचा सांभाळ करते. टाळेबंदी दरम्यान वसतिगृह बंद झाले आणि तिची नोकरी सुटली. या परिस्थितीत आम्ही तिच्यापर्यंत पोहोचलो. तिला आपतकालीन स्थितीत जीवनावश्यक वस्तू, किराणा भरून दिला. त्यामुळे सोनालीच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्या. 

टाळेबंदी संपल्यानंतर, आमच्या संबंधित एजन्सीने सोनालीकरिता नवीन रोजगार शोधला. आता ती पर्सनल ड्रायव्हर म्हणून नोकरी करत असून तिला मासिक रु. 9000 वेतन मिळते. 


चित्र 1 टाळेबंदीपूर्वी चित्र 2 आपल्या नवीन मालकीणबाई समवेत सोनाली 

ब्रिजस्टोनची वैश्विक सीएसआर वचनबद्धता दळणवळण, लोक आणि पर्यावरणावर लक्ष केंद्रित करते, तसेच अवर वे टू सर्वद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. ब्रिजस्टोन इंडिया आपल्या वचनबद्धतेसमवेत कार्यरत असून समाजासाठी महिला सबलीकरण, जैवविविधता संवर्धन, आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रसार करणे, शैक्षणिक तसेच क्षमता उभारणी कार्यक्रम राबवते.


युरोप,रशिया,मध्यपूर्व,भारत,आणि आफ्रिकेतील  ब्रिजस्टोनविषयी:

युरोप, रशिया, मध्य पूर्व, भारत आणि आफ्रिकेतील (बीएसईएमआयए) ब्रिजस्टोनचे मुख्यालय झवेंटेम (बेल्जियम)  येथे आहे. ही या दळणवळणासाठी टिकाऊ तसेच प्रगत पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे. याच्या महत्त्वपूर्ण टायर उत्पादनांत भर म्हणून बीएसईएमआयए टायर-केंद्री आणि दळणवळण पर्यायांचा वाढता पोर्टफोलियो देऊ करतो. जो ग्राहकांना हजारो टचपॉइंटसमवेत विस्तृत विक्री जाळे उपलब्ध करून देतो.   

ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने महिला सबलीकरण उपक्रम ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने महिला सबलीकरण उपक्रम Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads