कामतघर ताडाळी रस्त्याच्या दुरुस्ती कामाला मुहूर्त मिळाला ,नागरीकांनी सोडला सुटकेचा निश्वास
भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ,कामतघर ते ताडाळी या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने या निवासी वस्ती मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या विभागातील नागरीक त्रस्त झाले होते.या बाबत सर्वांकडून ओरड होत असताना या भागातील नगरसेवक यांनी सुध्दा महानगरपालिका प्रशासनाकडे रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याबाबत पाठपुरावा केला नंतर नुकताच या रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापती नंदिनी महेंद्र गायकवाड यांच्या शुभहस्ते पार पडला .या प्रसंगी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर ,तुषार चौधरी ,निलेश चौधरी ,हनुमान चौधरी, अशोक भोसले ,शाम अग्रवाल ,अस्मिता चौधरी, योगिता महेश पाटील ,दीपाली दिनेश पाटील ,आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांसह स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या रस्त्यावरील भुयारी गटर बनविणाऱ्या ईगल कंष्ट्रक्शन कंपनीने रस्ता पूर्ववत बनवून देण्याचे नियोजन असताना त्यांच्या कडून या कामास दिरंगाई झाली असून येत्या दहा दिवसांत हा रस्ता पूर्ववत करून मिळणार असल्याने नागरीकांना दिलासा मिळेल असे वक्तव्य माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी केले .या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिकांच्या रोषास लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सामोरे जावे लागत असल्याने मनपा आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊन रस्ता तात्काळ बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्यानंतर सदर ठेकेदार हा रस्ता बनवीत असल्याने या रस्त्यावरील वाहनचालकांना होणार त्रास कमी होणार असून भविष्यातील काँक्रीट रस्ता बनविण्याच्या कामास ही नागरीक सहकार्य करतील असा विश्वास नगरसेवक निलेश चौधरी यांनी व्यक्त केला .दरम्यान या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे दुष्टचक्रात अडकल्या सारखे होत असताना उशिरा का होईना या रस्त्याची दुरुस्ती होत असल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .
कामतघर ताडाळी रस्त्याच्या दुरुस्ती कामाला मुहूर्त मिळाला ,नागरीकांनी सोडला सुटकेचा निश्वास
Reviewed by News1 Marathi
on
November 27, 2020
Rating:

Post a Comment