भिवंडीत राष्ट्रवादी च्या आढावा बैठकीत बेशिस्त कार्यकर्त्यांना जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले खडे बोल
भिवंडी | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिस्तीने चालणार पक्ष असून कार्यकर्ते कमी असले तरी चालतील पण ते निष्ठावंत असावेत त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांचा बेशिस्त पणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले .ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भिवंडी शहर जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते .या प्रसंगी माजी खासदार आनंद परांजपे ,शहराध्याक्ष भगवान टावरे , माहिलाध्यक्षा स्वाती कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या बेशिस्त पणामुळे स्टेजवर गर्दी ,समोर खुर्च्या खाली हे चित्र समाधानकारक नसल्याचे सांगत मध्यंतरी भिवंडीत पक्ष संघटन हुल्लडगिरी करणाऱ्या बोगस व्यक्तीच्या हाती गेल्याने पक्षाचे बारा वाजले .आता भगवान टावरे सारख्या २० वर्षांपासून पक्षात कार्यरत व्यक्तीकडे पक्षाची सूत्रे सोपवित असताना त्यांनी नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत ,फक्त बोलून पक्ष वाढत नाही ,संघटन कमजोर आहे ,सत्य स्वीकारायला शिका ,पुढे जाऊन त्रास होत नाही . गटबाजी कमी करा ,पक्षाला ताकद द्या ,कोणी कोठे ही जाऊ द्या जो जोपर्यंत पक्षाचे काम करतोय तो आपला ,जो पक्षाची गद्दारी करेल त्याला बाहेर चा रस्ता दाखवू असे स्पष्ट शब्दात सांगत पक्षाचा सन्मान वाढविणे सर्वांचे काम आहे ,मी बेशिस्त पणा सहन करणार नाही असा सज्जड दम कार्यकर्त्यांना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला .
कार्यक्रमाच्या प्रारंभी भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष भगवान टावरे यांनी प्रास्ताविकात भिवंडी शहरात पक्ष बांधणी करीत असताना विविध धर्मीय नागरीकांना विविध पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात स्थान देत पक्ष वाढी साठी प्रयत्न करीत असताना सर्वानाच विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच भिवंडी शहरातील जनाधार वाढत आहे .भिवंडी शहरातील समस्या जाणून त्यांच्या सोडवणुकीसाठी पक्षाने बळ देण्याची गरज असल्याचे सांगत शहरातील मेट्रोच्या कामाला गती देणे ,क्लस्टर योजना राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीस अँड सुनील पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जब्बार काझी ,प्रवीण पाटील ,गयासुद्दीन अन्सारी ,अरीफ आलवी , राजेश चव्हाण ,रसूल खान ,प्रणित टावरे , यांनी विशेष मेहनत घेतली.
भिवंडीत राष्ट्रवादी च्या आढावा बैठकीत बेशिस्त कार्यकर्त्यांना जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले खडे बोल
Reviewed by News1 Marathi
on
November 01, 2020
Rating:

Post a Comment