Header AD

केंद्र सरकारच्या उर्जा क्षेत्राच्या खाजगी करण धोरणाविरूध्द कर्मचाऱ्यांची निदर्शने


विज (सुधारणा) कायदा २०२० रद्द करण्याची मागणी वीज कामगारअभियंते व अधिकारी यांच्या सहा संघटनांचा सहभाग...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यातील कामगारअभियंते व अधिकारी यांच्या कार्यरत सहा संघटनांनी केंद्र सरकारच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरूध्द व बीज कायदा २०२० रद्द करण्याच्या मागणी करीता व्यवस्थापनाला नोटिस देऊन आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या तेजश्री या कार्यालयाबाहेर या कर्मचारयांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.   


विद्युत (संशोधन) कायदा २०२० या कायद्याव्दारे केन्द्र सरकारने उर्जा क्षेत्र खाजगीकरण करण्याचे व भांडवलदारांच्या कंपन्याकार्पोरेट घराणे आणि मर्जीतील विशिष्ट व्यक्तींना फायदा देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केला असून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीतील ३ कायदे घाईगडबडीने लोकसभेत पारित करुन घेतले वीज कामगार यांच्या करीता हा कायदा अत्यंत घातक असून खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त फायदे देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केला आहे.


 जनतेच्या हजारो हजार कोटी रूपयाच्या गुंतवणुकीने उभारलेले महाराष्ट्रांतील वीजेचे जाळे व संपत्ती खाजगी भांडवलदारांना कोगतिही गुंतवणूक न करता सुपुर्द करण्याची केन्द्रीय उर्जा खात्यान  त्याचप्रमाणे केन्द्रिय उर्जामंत्री वीज कायदा पारित करण्याच्या प्रयत्नांत असल्याचा आरोप या संघटनांनी केला असून याच्या निषेधार्थ संप पुकारण्यात आला आहे.


उर्जा उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या उद्देशाने काढलेला वीज कायदा (संशोधन) २०२० आणि स्टॅन्डर्ड बिडीग डाक्युमेंट रद्द करा. अस्तित्वात असलेल्या सर्व फ्रेन्चाईसी रद्द करा व भविष्यात नियुक्ती बंद करा. सर्व कंपन्यांचे केरळ व हिमाचल राज्याप्रमाणे एकत्रीकरण करा. सर्व कंत्राटी कामगारांना तेलंगाना उर्जा उद्योगात जसे कायम केले तसे कायम करा. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करा. उर्जा उद्योगातील सर्व रिक्त जागांवर भरती करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

केंद्र सरकारच्या उर्जा क्षेत्राच्या खाजगी करण धोरणाविरूध्द कर्मचाऱ्यांची निदर्शने केंद्र सरकारच्या उर्जा क्षेत्राच्या खाजगी करण धोरणाविरूध्द कर्मचाऱ्यांची निदर्शने Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads