Header AD

राहनाळ जिप शाळेत संविधान दिन उत्साहात संपन्न

 





भिवंडी , प्रतिनिधी   :  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने तयार झालेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे गावातील समाजसेवक दीपक भोईर, केंद्रप्रमुख जयश्री सोरटे, मुख्याध्यापक सुरेश साळुंखे, पदवीधर शिक्षक अजय पाटील, सहशिक्षका अनघा दळवी, व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तिकेचे पूजन केले.


यावेळी शिक्षक अजय पाटील यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि बाबासाहेबांचं योगदान याबद्दल मार्गदर्शन केलं. जयश्री सोरटे  यांनी संविधान निर्मिती मध्ये बाबासाहेबांचे योगदान आणि संपूर्ण भारतवर्षातील प्रत्येक व्यक्तीसाठी घटनेमध्ये कायदे, तत्त्व, नियम तयार केलेले आहेत याचा उल्लेख केला. अनघा दळवी यांनी उपस्थितांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेतलं. 


याचवेळी शिक्षक व विद्यार्थी यांना सोबत घेऊन तयार केलेला संविधान दिन या माहितीपटाचे जयश्री सोरटे यांच्या हस्ते युट्युबवर उद्घाटन करण्यात आले. या माहितीपटात अंजुरफाटा शाळेची विद्यार्थिनी वैशाली लोखंडे, राहनाळ शाळेची विद्यार्थ्यांनी श्रावणी फाटक, डुंगे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,पाळेखल शाळेच्या शिक्षिका विद्या शिर्के, राहनाळ शाळेचे पदवीधरशिक्षक अजय पाटील यांनी अभिवाचन केले आहे. व्हिडिओ निर्मिती अजय पाटील यांनी केली आहे. मुख्याध्यापक साळुंखेसर यांनी या माहितीपटाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. 
राहनाळ जिप शाळेत संविधान दिन उत्साहात संपन्न राहनाळ जिप शाळेत संविधान दिन उत्साहात संपन्न Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads