Header AD

बड्या बिल्डरचा विरोध मोडून काढत ७ हजार कुटुंबांना अखंड वीजपुरवठा भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नांना यश

ठाणे,  प्रतिनिधी  :  ब्रह्रांड परिसरातील तब्बल ७ हजार कुटुंबांना आता अखंड २४ तास वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एका भूखंडातून केबल टाकण्याच्या कामासाठी महावितरण कंपनीला मज्जाव करणाऱ्या बड्या बिल्डरचा विरोध मोडून काढत भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी नुकतेच काम पूर्ण करून घेतले. अन्, दोन वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला.

ब्रह्रांड परिसरातील अनेक इमारती, चाळी आणि झोपडपट्टी परिसराला भूमिगत केबलद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र, काही इमारती व चाळींमध्ये जुन्या खांबांवरून वीजपुरवठा होत होता. अनेक वेळा पक्षी बसल्यानंतर वा जोरदार वाऱ्यामुळे खांबांवरील वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनावले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भूमिगत केबलसाठी प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. 


मात्र, एका बड्या बिल्डरने आपल्या भूखंडातून केबल जात असल्यामुळे आडकाठी केली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून २० लाखांचा निधी पडून असूनही काम रेंगाळले होते. त्यातच सध्या कोरोना आपत्तीमुळे शेकडो चाकरमानी कुटुंबांचे `वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. त्यात सातत्याने विजेच्या लपंडावामुळे अनेक वेळा काम ठप्प होत होते. अखेर या प्रश्नाची तीव्रता ध्यानात घेऊन नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी भूमिगत केबल टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केबलचे काम सुरू करण्याची विनंती केली होती.

ब्रह्रांड संकुलातील काही सोसायट्या, श्री जी व्रजभूमी संकूलातील काही रहिवाशांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. मात्र, काही वेळानंतर त्या बड्या बिल्डरचे अधिकारी बाऊन्सर्ससह धडकले. त्यांनी जबरदस्तीने काम बंद पाडले. काही वेळानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. नगरसेवक मनोहर डुंबरे, रहिवाशांचे प्रतिनिधी, पोलिस आणि बिल्डरच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. 


त्यात तब्बल सात हजार कुटुंबांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत आज मार्गी लागलाच पाहिजे, अशी भूमिका नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मांडली. अखेर त्यांच्या आग्रही भूमिकेपुढे बिल्डरने नमते घेत भूमिगत केबल टाकण्यास परवानगी दिली. त्यानंतर दिवसभरात काम पूर्ण झाल्यामुळे आता सात हजार कुटुंबांना २४ तास अखंडित वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बड्या बिल्डरचा विरोध मोडून काढत ७ हजार कुटुंबांना अखंड वीजपुरवठा भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नांना यश बड्या बिल्डरचा विरोध मोडून काढत ७ हजार कुटुंबांना अखंड वीजपुरवठा भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नांना यश Reviewed by News1 Marathi on November 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads