Header AD

युनियनच्या वतीने भिवंडी मनपाच्या १०० कर्मचाऱ्यांना रु.७०००/- दिवाळी बोनस चे वाटप

 
भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी  कार्यरत असलेल्या *"अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या" वतीने जवळपास १०० कर्मचाऱ्यांना रू. ७०००/- दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून यंदाची दिवाळी गोड जाणार असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. 


अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असतात. कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून "'भिवंडी महोत्सव'" सारखे कार्यक्रम , कर्मचाऱ्यांसाठी "व्यसनमुक्तीचे" कार्यक्रम, कर्मचाऱ्यांच्या मुलांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी "कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा सत्कार" असे विविध कार्यक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन करीत असते.


त्याच अनुशंगाने भिवंडी मनपाची आर्थिक परिस्थिती नेहमीच हलाखीची असल्यामुळे दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) मिळेल की नाही? याची अनिश्चितता असते. म्हणून युनियनने गेल्या वर्षीपासून एक नवीन उपक्रम हाती घेतला आणि "कर्मचारी सहाय्य निधी ग्रुपची" स्थापना केली. आणि त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना निश्चित  दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग शोधून काढला. गेल्यावर्षी दिवाळी दारात आली तरी भिवंडी मनपाकडून बोनसची घोषणा झाली नव्हती. मात्र, युनियनच्या सदस्यांना रु. ७०००/- बोनस देण्यात आले होते. त्यावेळीही कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्याचनुसार यवर्षीही भिवंडी मनपा कडून दिवाळी सानुग्रह अनुदान मिळण्याच्या आधी युनियनच्या वतीने तब्बल १०० कर्मचाऱ्यांना रु. ७०००/- च्या बोनसचे वाटप काल करण्यात आले आहे. 


यावर्षी कोरोनाचे सावट असूनही पालिकेच्या बोनसची वाट न पाहत युनियनने बोनस दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आनंदाने दिवाळी साजरी करता येणार आहे. तसेच पालिकेचे रु. ९०००/- आणि युनियनचे रु. ७०००/- असे एकुण तब्बल रु. १६०००/- बोनस १०० कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे दुधात साखर पडली असा योग दरवर्षी यावा अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना लाभ होईल अशा चांगल्या उपक्रमात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे!
युनियनच्या वतीने भिवंडी मनपाच्या १०० कर्मचाऱ्यांना रु.७०००/- दिवाळी बोनस चे वाटप युनियनच्या वतीने भिवंडी मनपाच्या १०० कर्मचाऱ्यांना रु.७०००/- दिवाळी बोनस चे वाटप Reviewed by News1 Marathi on November 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads