Header AD

कल्याण डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

५१,२८१ एकूण रुग्ण तर १०२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०९  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   

 

आजच्या या १०९  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५१,२८१ झाली आहे. यामध्ये ११३६ रुग्ण उपचार घेत असून ४९,१२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१,  कल्याण प –  ३०डोंबिवली पूर्व ४०,  डोंबिवली प – ६, मांडा टिटवाळा – ७, तर मोहना येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २३ रुग्ण टाटा आमंत्रामधून५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून१ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून६ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads