Header AD

दिपावली निमित्त सलग चौथ्या वर्षी गरीब नागरिकांना धान्य वाटप, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम
ठाणे , प्रतिनिधी  :  मदत हेच खरे जीवन असे घोष वाक्य मनात ठेवून ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या गरीब नागरिकांना खरी मदतीची गरज आहे अशा नागरिकांना त्यांच्या खेड्यापाड्यातील घरी जाऊन मदत करत आहे. यामुळे सलग चौथ्या वर्षी देखील प्रतीष्ठाणच्या वतीने माहुली किल्ला जवळील जुनावना पाडा येथे नागरिकांना तसेच अवनी मतिमंद शाळा येथे दिपावली निमित्त धान्य वाटप करण्यात आले.


गडकिल्यांच्या स्वच्छता तसेच वृक्षारोपण मोहीमेत अग्रेसर असणाऱ्या ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान मार्फत कित्येक उपक्रम राबविण्यात येतात. गडकिल्यांच्या स्वच्छता मोहीम करत असताना. आजही काही भागात कुडाच्या घरात नागरिक राहत आहेत. प्रतिष्ठानच्या पाहणी दरम्यान माहुली किल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुनावना पाडा या गावी दोन वर्षांपूर्वी लाईटची व्यवस्थाच नव्हती. 
यामुळे प्रतिष्ठाणच्या वतीने या गावी धान्य वाटप करण्याकरिता गेले असता या गावातील स्थानिकांनी आमच्या घरी लाईटकरिता आपण प्रयत्न करावे अशी विनंती पूर्वक अर्ज केला होता. यामुळे या गावी संस्थेच्या पाठपुराव्या नंतर या गावी लाईटची व्यवस्था महावितरणच्या मार्फत झाल्या नंतर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. दोन वर्षांपूर्वी लाईट करीता केलेले ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठांनचे प्रयत्न यशस्वी झाले. 


यामुळे यावर्षी पुन्हा या गावी दिपावली निमित्त धान्य वाटप केल्यानंतर नागरिकांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी मदत हेच खरे जीवन असे आम्ही प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मनात घेऊन गरीब नागरिकांना कशाप्रकारे मदत करता येईल, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न मागील चार वर्षोपासून सुरू असून आम्ही हा प्रयत्न कायम सुरू ठेवणार असल्याचे ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले. यावेळी धान्य देण्याकरिता मदत म्हणून सागर पाटील, निखिल पाटील, रत्नमाला जाधव, अश्विनी वक्ते, संजीवनी जाधव, आकाश कचोले, करिश्मा मुलांनी, राजेंद्र उतेकर, राहुल शेळके, संजोग शिलकर, अरुण जाधव, सुनिता चव्हाण, प्रिती जयस्वाल, सुनिता मामिडाल, युगंधरा गलैया, शुभांगी शुक्ला, सोमण मावशी, उल्का आपटे, रुपेश घरत, योगेश पै, सानिका क्षिरसागर, नीलम लाखन, प्रतीक्षा सावंत, विनिता परब यांनी मोलाचा वाटा उचलून प्रतिष्ठानकडे धान्याची मदत पोहोचली होती.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या भिवंडी महिला अध्यक्षा प्रज्ञा जाधव यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मराठा संघाचे प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या सुचनेनुसार उपाध्यक्ष अमित मोकाशी, खजिनदार सुरज कदम, सदस्य अश्विनी कुंभार, नम्रता पाटील, प्रज्ञा जाधव, ओंकार बहाडकर, संतोष पांडे, सुनीता मामेदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिपावली निमित्त सलग चौथ्या वर्षी गरीब नागरिकांना धान्य वाटप, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम दिपावली निमित्त सलग चौथ्या वर्षी गरीब नागरिकांना धान्य वाटप, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम Reviewed by News1 Marathi on November 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

■मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील एचपीसीएलच्या नवीन चार्जिंग स्टेशनला दिली भेट ... मुंबई, ८ मार्च २०२१ :  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमजी मो...

Post AD

home ads