Header AD

तब्बल १४३ दिवसांनी कल्याण डोंबिवलीत रुग्णसंख्या दोन आकडी


■कमी रुग्णसंख्येमुळे नागरिकांना दिलासा ८८ नवे रुग्ण तर २ जणांचा मृत्यू ५०,२८२ एकूण रुग्ण तर १००८ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत २११ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल १४३ दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दोनआकडी आली असून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पालिका क्षेत्रात आज नव्या ८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



      याआधी  ११ जून रोजी ८७ रुग्णांची आणि ५ मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर १२ जून रोजी कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होऊन १८५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर १ नोव्हेंबर रोजी १३० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आज २ नोव्हेंबर रोजी तब्बल १४३ दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत आली असून आज ८८ रुग्ण आढळल्याने दिलासादायक बाब असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.


 

आजच्या या ८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,२८२ झाली आहे. यामध्ये १५२७ रुग्ण उपचार घेत असून ४,७४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प – ३२डोंबिवली पूर्व १९डोंबिवली प- १८मांडा टिटवाळा – , मोहना – तर पिसवली येथील एका रूग्णांचा समावेश आहे. 

       


डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३७ रुग्ण टाटा आमंत्रामधून१० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ४ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तसेच १ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


तब्बल १४३ दिवसांनी कल्याण डोंबिवलीत रुग्णसंख्या दोन आकडी तब्बल १४३ दिवसांनी कल्याण डोंबिवलीत रुग्णसंख्या दोन आकडी Reviewed by News1 Marathi on November 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहिम अभियानाचे आयोजन

■' 'संयुक्त सक्रिय क्षय व कुष्ठरुग्ण शोध मोहिम 2020'' अभियानाबाबत आढावा बैठकीत बोलताना अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख सोबत ...

Post AD

home ads