Header AD

संकेत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांना पणती, उटणे वाटप
कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमध्ये संकेत बहुद्देशीय संस्थेचे सुनील घेगडमल आणि मित्र परिवार तसेच महिला मंडळ शिवाजी नगर यांच्यावतीने महिलांना दिवाळीसाठी पणती, उटणे वाटप करण्यात आले.


       कल्याण मधील वालधुनी परिसरात संकेत बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजसेवक सुनील घेगडमल हे नागरिकांच्या अडीअडचणी, समस्यां सोडवत आहे. नागरिकांच्या समस्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. लॉकडाऊन काळात देखील वालधुनी परिसरातील नागरिकांना अन्नधान्य, जेवण तसेच इतर जीवनावश्यक वस्तू त्यांच्यामार्फत पुरविण्यात आल्या. असे अनेक समाजोपयोगी उपक्रम सुनील घेगडमल राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त संकेत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांना दिवाळीसाठी पणती, उटणे वाटप करण्यात आले.


       यावेळी समाजसेवक सुनील घेगडमल यांनी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच दर पावसाळ्यात वालधुनी नदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असते. यावर तोडगा काढण्यासाठी वालधुनी नदी भवती उंच संरक्षक भिंत बांधण्यासाठी संकेत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे घेगडमल यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकीत पैशाच्या आमिषाला बळी न पडता नागरिकांच्या समस्या सोडविणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन केले.  


संकेत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांना पणती, उटणे वाटप संकेत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांना पणती, उटणे वाटप Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads