Header AD

पॉवर लिफ्टिंगमध्ये ठाण्याचा निखिल भगत तीन सुवर्ण पदकांचा मानकरी

 


सुवर्ण पदकासह प्रशस्तिपत्राचा स्वीकार करताना निखिल भगत...

ठाणे |  प्रतिनिधी  : २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान लोंबार्ड , अमेरिका येथे २०२० ए.डब्लू.पी.सी. वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेचे कोविड १९ च्या नियमांचे पालन करून आयोजन करण्यांत आले. या स्पर्धेतील ओपन क्लासिक रॉ गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना ठाण्याच्या २९  वर्षीय निखिल हेमंत भगत या युवकाने ७५ किलो वजनी गटात तीन सुवर्ण पदकांची कमाई करीत हॅट्रिक साधली. 
भारतीय  संघाचे प्रशिक्षक मोहम्मद अझमत यांचे निखिलला मार्गदर्शन लाभले तर डब्लू.पी.सी..च्या भारत  शाखेचे अध्यक्ष दलजित सिंग यांचे प्रोत्साहन लाभले.निखिल भगत याचे तिहेरी सोनेरी असे : फुल्ल पॉवर - स्कॉट १७५ किलो,डेडलीफ्ट १९० किलो, बेच प्रेस १०५ किलो  एकूण ४७०  किलो (सुवर्ण), बेंच प्रेस - १०५ किलो (सुवर्ण), डेड लिफ्ट १९२.५ किलो (सुवर्ण) ह्या चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्यामुळे भारतातून निखिल भगत यांना शुभेच्छा येत आहेत.पॉवर लिफ्टिंगमध्ये ठाण्याचा निखिल भगत तीन सुवर्ण पदकांचा मानकरी पॉवर लिफ्टिंगमध्ये ठाण्याचा निखिल भगत तीन सुवर्ण पदकांचा मानकरी Reviewed by News1 Marathi on November 02, 2020 Rating: 5

1 comment

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads