Header AD

कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आमदार निरंजन डावखरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी




रत्नागिरी, प्रतिनिधी  : राज्यातील चार कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, आमदार डावखरे यांनी दापोलीतील कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आंदोलनाला पाठिंबा दिला.
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य व आमदार म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी काल दापोलीला भेट दिली.


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील कृषि विद्यापीठ सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरी सेवेतील नियम व सेवा शर्ती जशाच्या तशा लागू आहेत. एकिकडे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असताना, कृषि विद्यापीठातील कर्मचारी वंचित आहेत, याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी खंत व्यक्त केली. तसेच या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याकडेही हा प्रश्न मांडणार असल्याचे श्री. डावखरे यांनी नमूद केले.
दरम्यान, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचीही निरंजन डावखरे यांनी भेट घेतली.
कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आमदार निरंजन डावखरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आमदार निरंजन डावखरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads