Header AD

भाऊबीजेला गावी जात आले नाही म्हणून बहिणीला भावाची अनोख्या पद्धतीने भेट

भिवंडी ,  प्रतिनिधी  :  बहीण आणि भावाच्या नाते  अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन नंतर भाऊबीज समजला जातो.  यंदा  मात्र  देशभरात करोनाचे संकट असल्यामुळे भाऊबीज एकत्रितपणे साजरे करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी, बिहारला गावी जाता आले नाही म्हणून,  एका भावाने डोक्यावरील केसात 'हॉपी भाईदुज' असे अक्षर कोरून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने दोन्ही बहिणीचा आशीर्वाद घेतला.  शंकरकुमार साहू असे या तरुणाचे नाव असून तो  मूळचा बिहार राज्यातील गया जिल्ह्याचा रहिवाशी आहे. सध्या तो भिवंडीतील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे (सुपरवायरज)चे काम करून भिवंडीतील हनुमान नगर परिसरात गेली ९ वर्षापसून राहतो. 

 गेल्या ७ महिन्यात ७ वेळा डोक्यावरील केसात अक्षर कोरून कोरोना विषयी जनजागृती 

कोरोनाच्या काळात सुरवातीला भिवंडीत प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी त्यानेही लॉकडाऊन काळात डोक्यावरील केसात विविध प्रकारचे संदेश देणारे अक्षर कोरून तो राहत असलेल्या परिसरात कोरोना विषयी जनजागृती करीत होता. त्याने गेल्या ७ महिन्यात ७ वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीसाठी अक्षरे कोरून सकाळ ,संध्याकाळ त्यावेळी नागरिकांना कोरोनापासून बचाव कसा करावा असे संदेश देत होता. विशेष म्हणजे सर्वात आदी याची 'ई टीव्ही भारत'ने दखल घेऊन  मे महिन्यात त्याच्या कोरोना विषयी सुरु असलेल्या जनजागृती बाबत बातमी प्रसिद्ध केली होती. 

 

बहिणीच्या आठवणीने झाला भावुक 

शंकरकुमार याला तीन  बहिणी आहेत. त्यापैकी  दोघीही बिहार मधील गया जिल्ह्यात राहतात, तर एका  बहिणीचे निधन झाले. शंकरकुमार सांगतो कि, भिवंडीत वर्षभर काम करीत असताना केवळ  मूळगावी बहिणीसोबत दिवाळी साजरी करणासाठी मी दरवर्षी जात होतो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे जाता आले नाही. त्यामुळे सातव्यांदा डोक्यावरील केसात बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी हॉपी  भाईदुज अक्षरे कोरली  आणि  व्हिडिओ  कॉलिंग करून बहिणींचे आशीर्वाद घेतल्याचे सांगत भावुक झाला.
भाऊबीजेला गावी जात आले नाही म्हणून बहिणीला भावाची अनोख्या पद्धतीने भेट भाऊबीजेला गावी जात आले नाही  म्हणून बहिणीला भावाची अनोख्या  पद्धतीने  भेट Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads