भिवंडीत पेट्रोल पंपावरच ओमनी व्हॅनला भीषण आग आगीमुळे पेट्रोल पंपावर पळापळ
भिवंडी , प्रतिनिधी : पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी आलेल्या एका प्रवासी ओमनी व्हॅनला गॅस भरताच अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. हि घटना भिवंडी - नाशिक जुना मार्गावरील चवींद्रा गावाच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. मात्र या घटनेमुळे पेट्रोल पंपसह परिसरात खळबळ उडून नागरिकांची जिवाच्या भीतीने पळापळ झाली होती. तर काही वेळातच ओमनी व्हॅन जळून खाक झाली आहे.
भिवंडी तालुक्यातील चवींद्रा गावात हिंदुस्थान (एचपी)च्या पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये सीएनजी गॅस भरण्याची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. अशातच आज दुपारच्या सुमाराला प्रवाशी वाहतूक करणारी ओमनी व्हॅन सीएनजी गॅस भरण्यासाठी आली. त्यावेळी व्हॅनमध्ये पंपावरील कर्मचाऱ्याने गॅस भरला आणि चालकाने व्हॅन पुढे घेण्यास सुरु करताच अचानक व्हॅनने पेट घेतला.
हे पाहून पेट्रोल पंपावर एकच पळापळ झाली.आणि पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी असलेल्या बाटला तसेच काही यंत्रणांचा आगीवर वापर सुरु केला. तर दुसरीकडे भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयात घटनेची माहिती मिळताच काहीवेळातच अग्निशमनची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मात्र तोपर्यत ओमनी व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली आहे.
दरम्यान, कुठल्याही वाहनांत असलेल्या सीएनजी गॅसची टाकीची तपासणी करणे बंधनकारक असून ती अधिकृत दुकानातून द्यावी असे शासनाचे नियम आहे. मात्र भिवंडीसह इतरही शहरात याचे पालन न करताच एखाद्या गॅरेजवाल्याकडून सीएनजी गॅसची टाकी वाहनांत बसविण्यात येत असल्याचे अश्या आगीच्या दुर्घटना घडत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
भिवंडीत पेट्रोल पंपावरच ओमनी व्हॅनला भीषण आग आगीमुळे पेट्रोल पंपावर पळापळ
Reviewed by News1 Marathi
on
November 30, 2020
Rating:

Post a Comment