Header AD

कल्याण डोंबिवलीत ५९ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

 

■५१,१७२ एकूण रुग्ण तर १०२० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५९  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक  जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   

 

आजच्या या ५९  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५१,१७२ झाली आहे. यामध्ये ११६४  रुग्ण उपचार घेत असून ४८,९८८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१४,  कल्याण प –  डोंबिवली पूर्व १२,  डोंबिवली प येथील  रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २२ रुग्ण टाटा आमंत्रामधून४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ५९ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ५९ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads