Header AD

कल्याण डोंबिवलीत १७५ नवे रुग्ण तर ३ मृत्यू

 

■५३,३५० एकूण रुग्ण तर १०५३ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५४ रुग्णांना डिस्चार्ज..


 

कल्याण ,कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १७५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १७५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५३,३५० झाली आहे. यामध्ये १५४६ रुग्ण उपचार घेत असून ५०,७५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २१कल्याण प – ७०डोंबिवली पूर्व – ४८डोंबिवली प – २५मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २१ रुग्ण टाटा आमंत्रामधून६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १७५ नवे रुग्ण तर ३ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १७५  नवे रुग्ण तर ३ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads