Header AD

भिवंडी कल्याण मार्गावर महाकाय झाड कोसळले सुदैवाने जिवीत हानी टळली
भिवंडी ,  प्रतिनिधि  :  भिवंडी कल्याण मार्गावर असलेल्या लाहोटी कंपाउंडच्या बाजूला एक महाकाय झाड कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी घडली नसली तरी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चार चाकी टेम्पो व एका दुचाकीवर हे झाड कोसळल्याने या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने कल्याण भिवंडी मर्हावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मनपा आपत्ती व्यवस्थापन , वाहतूक पोलीस व अग्निशम दलाने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. विषेश म्हणजे हि घटना घडण्या आधी केवळ १५ ते २० मिनिटे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र वाहतूक पोलोसांच्या सतर्कतेने हि वाहतूक कोंडी सुटली आणि हे झाड कोसळले. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली आहे. 
भिवंडी कल्याण मार्गावर महाकाय झाड कोसळले सुदैवाने जिवीत हानी टळली भिवंडी कल्याण मार्गावर महाकाय झाड कोसळले सुदैवाने जिवीत हानी टळली Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads