Header AD

भिवंडीतील अंजूरफाटा ते सिडको ठाणे, अंजूरफाटा ते कापुरबावडी ठाणे रिक्षा स्टॅन्ड मनसेने केले सुरु
भिवंडी ,  प्रतिनिधी   :  शहरातील प्रवाशांना ठाण्याला जाण्यासाठी रिक्षा योग्य दारात आणि लवकर उपलब्ध होण्यासाठी मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार   मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पांडुरंग पाटील यांच्या प्रयत्नातून अंजूरफाटा ते सिडको ठाणे, अंजूरफाटा ते कापुरबावडी ठाणे रिक्षा स्टॅन्ड सुरू करून आज या रिक्षा स्टॅन्डचे उदघाट्न करण्यात आले यावेळी मोठ्या प्रयत्नातून रिक्षा चालक - मालक उपस्थित होते त्याच प्रमाणे   वाहतुक सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष (अण्णा ) म्हात्रे यांनी मोठी  मेहनत घेऊन 
रिक्षा संघटना एकजुट करण्याचे काम करत असून , भिवंडी तालुक्यातून अनेक टेम्पो चालक मालक,  रिक्षा चालक मालक मनसेच्या वहातुक सेने कडे आकर्षीत झाले असून , या पुढे मनसे या लोकांना दिलासा देईल.


आजच जिल्हा सचिव संजय पाटील यांनी प्रांत अधिकारी यांना ऑनलाईन फोर्टल मुळे भूमी पुत्रांचा व्यवसाय धोक्यात आल्याचे  निवेदन  देऊन , त्यांची वेळ मागितली असून , स्थानिक भुमी पुत्र असलेले रिक्षा - टेम्पो चालक मालक यांना शासन दरबारी न्याय मिळालाच पाहिजे ,अन्यथा परिस्थीती चिघळल्यास , कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्या शिवाय राहणार नाही , असा इशारा मनसेने शासनाला दिला आहे,या वेळी माथाडी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष भारत पाटील , विद्यार्थी सेनेचे संतोष साळवी ,मनसेचे तालुका सचिव शरद नागावकर , तालुका संघटक संतोष बाळाराम पाटील , स्थानिक विभाग अध्यक्ष जगदिप घरत ,वहातुक सेनेचे तालुका संघटक संतोष भगवान म्हात्रे , तालुका संघटक व खारबाव ग्राम पंचायतीचे मनसेचे  उप सरपंच मनोज म्हात्रे उपस्थित होते.
भिवंडीतील अंजूरफाटा ते सिडको ठाणे, अंजूरफाटा ते कापुरबावडी ठाणे रिक्षा स्टॅन्ड मनसेने केले सुरु भिवंडीतील अंजूरफाटा ते सिडको ठाणे, अंजूरफाटा ते कापुरबावडी ठाणे रिक्षा स्टॅन्ड मनसेने केले सुरु Reviewed by News1 Marathi on November 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads