Header AD

निळ्या रंगाच्या शर्टामुळे पकडले चोरटे
कल्याण, कुणाल म्हात्रे : भररस्त्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करून लुटणाऱ्या दोन आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे एका चोरट्याने निळ्या रंगाचा  शर्ट घातला आहे. फक्त एवढीच माहिती पोलिसांकडे होती आणि या निळ्या रंगाच्या शर्टच्या साह्याने पोलिसांनी या दोघा चोरांना शोधून काढले.


       कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात एका इमारतीचे काम सुर आहे.  याठिकाणी अफजल अन्सारी हे काम करतात. अफजल अन्सारी हे उल्हासनगरला राहतात काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अफजल अन्सारी हे इंदिरानगर परिसरात पायी जात असताना एका दुचाकीवर बसलेले दोन तरुणांनी त्यांना हटकले. चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली त्यांचा  जवळील असलेल्या मोबाईल आणि रोकड घेऊन चोरटे पसार झाले.

अफजल यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अफजल यांनी पोलिसांना फक्त एवढेच सांगितले की या दोन्ही लुटारू पैकी एकाने निळा रंगाची शर्ट घातली आहे महात्मा पुणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकरपी आई संभाजी जाधव यांनी एक पोलीस पथक तयार केला चोरट्याने निळा रंगाची शर्ट घातली आहे  या आधाराने पोलिसांनी संपूर्ण इंद्रा नगर पिंजूळ  काढले.


आखेर नागरिकांच्या मदतीने त्या निळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या तरुणाला पोलीस कर्मचारी जेके शिंदे आणि विजय भालेराव यांनी शोधून काढले. पोलिसांनी प्रवीण चव्हाण नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असताना त्याने कबुली दिली.  त्याने आणि त्याच्या एका साथीदारांनी अफजल अन्सारी सोबत रूपा ची घटना केली आहे यानंतर प्रवीण चव्हाण आणि विकास याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असून  पुढील तपास पोलीस अधिकारी प्रकाश पाटील हे करीत आहेत.

निळ्या रंगाच्या शर्टामुळे पकडले चोरटे निळ्या रंगाच्या शर्टामुळे पकडले चोरटे Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads