Header AD

माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी भरत जाधव यांची बिनविरोध निवड
भिवंडी , प्रतिनिधी  :  तालुक्यातील आठगाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोनगांव येथे आयोजित केलेल्या ठाणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी  ठाणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी भरत नकुल  जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या  सर्वसाधरण सभेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे माजी अध्यक्ष एस.व्ही.डोंगरे,सभेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष अरुण जाधव, कार्यवाह भरत जाधव,उपाध्यक्ष आर.एस.खैरनार,शरद धानके, कुणाल दोंदे, कोषाध्यक्ष रामदास म्हात्रे, उपकार्यवाह अतुल पाटील,हिशेब तपासनीस बबन वंजारी,राम पाटील आदी संघटनेचे पदाधिकारी व ठाणे जिल्ह्यातील शिक्षकेतर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.या वार्षिक सर्वसाधारण सभेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे माजी अध्यक्ष एस.व्ही.डोंगरे यांनी कामकाज पाहिले.सदरची निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बिनविरोध करण्यात आली.आगामी तीन वर्षांकरिता जिल्हा कार्यकारिणीची निवड  करण्यात आली असून त्यामध्ये अध्यक्ष म्हणून भरत जाधव,कार्याध्यक्ष आर .एस खैरनार,कार्यवाह अतुल पाटील,उपाध्यक्ष शरद धानके ,कुणाल दोंदे,शांताराम आरोटे,कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपकार्यवाह सुनील अहिरराव , सिताराम शेळके ,योगिता गोराडकर,हिशेब तपासणीस महेश भगत आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


 माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना ठाणे जिल्हा कार्यकारणीवर निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे माजी अध्यक्ष एस .व्ही. डोंगरे ,मावळते अध्यक्ष प्रमोद पाटील,राम पाटील, अरुण जाधव ,रामदास म्हात्रे आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन संघटनेचे माजी कार्यवाह भरत जाधव यांनी केले.
माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी भरत जाधव यांची बिनविरोध निवड माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी भरत जाधव यांची बिनविरोध निवड Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads