Header AD

कर्नाटक सरकारचा शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध

 


भिवंडी  | प्रतिनिधी  : कर्नाटक राज्यातील बेळगाव, निपाणी,धारवाड  हा मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रात सामील व्हावा या साठी स्थानिक मराठी भाषिक मागील कित्येक वर्षे आंदोलन करून महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी करीत आहेत .त्यासाठी आज बेळगाव येथील आयोजित कार्यक्रमास स्थानिक कर्नाटक सरकारने पोलीस बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली.



त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष भगवान टावरे यांच्या नेतृत्वाखाली 
शेकडो कार्यकर्त्यांनी हाताच्या दंडावर काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जाहीर निषेध नोंदवला आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी जब्बार काझी ,गयासुद्दीन अन्सारी ,मोबिन अहमद ,शहादत अन्सारी ,सुरेंद्र मुळे ,रसूल खान ,शमीम [मुन्ना ] अन्सारी ,सुनील पवार यांसह शेकडो कार्यकर्ते यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला .

कर्नाटक सरकारचा शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध कर्नाटक सरकारचा शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एक हजार रिक्षांवर पाठींब्याचे पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

कल्याण , कुणाल म्हात्रे   :    दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आता या बाबत डों...

Post AD

home ads