भिवंडी पालिकेत संविधान दिन साजरा
भिवंडी , प्रतिनिधी : 26 नोवेंबर संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्या निमित्ताने पालिकेत पालिकेत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सन्माननीय नगरसेवक विकास निकम, उपायुक्त मुख्यालय डॉक्टर दीपक सावंत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाचे उद्देशीका यांचे वाचन करून, राज्य घटनेचे महत्व विषद केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन पाटील, कर विभागाचे कार्यालय अधीक्षक बाळाराम जाधव, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, मार्केट विभागप्रमुख नेहाला मोमीन,बांधकाम कार्यलय अधीक्षक किशोर भदाणें व अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment