Header AD

आगामी महापालिका निवडणूकित महाविकास एकत्र लढणार माजी आमदार व कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राज्यात आगामी महापालिका निवडणूकित महाविकास एकत्र लढणार असल्याचे सुतोवाच माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले आहे. कल्याण डोंबिवली मध्ये राष्ट्रवादीला लागलेली घर घर थांबवण्यासाठी वरिष्ठांनी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हाती दिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आज संविधान दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बाबसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कार्यकर्ते व पदाधिकारयांसह संविधानाचे वाचन केले. त्यानंतर २६/११ च्या दाहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.


यावेळी बोलताना जगन्नाथ शिंदे यांनी संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतल्याचे सांगितले. तसेच मला पक्ष बांधणी व पक्ष विस्तारासाठी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी  महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार निश्चित पणे पाच वर्षे पूर्ण करेल, महाराष्ट्रात येणाऱ्या महापालिका निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीतर्फे लढण्यात येतील याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील कल्याण डोंबिवली महापालिकेत महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल असे शिंदे यांनी सांगितले.  दरम्यान यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, मनोज नायर, सुभाष गायकवाड, श्याम आवारे, रामदास पाटील, शरद गवळी, प्रशांत माळी, योगेश माळी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी महापालिका निवडणूकित महाविकास एकत्र लढणार माजी आमदार व कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आगामी महापालिका निवडणूकित महाविकास एकत्र लढणार माजी आमदार व कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads