Header AD

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहर जि काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली




ठाणे , प्रतिनिधी  :  भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी,महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहर(जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या मानव आणि माहिती अधिकार विभागातर्फे रोजी बाळकूम नाका येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या सह ठाणे महानगरपालिका स्थायीसमिती समिती सभापती संजय भोईर,जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर,माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे,मुब्रा प्रभाग समिती अध्यक्षा सौ.दिपाली मोतीराम भगत, नगरसेविका उषा संजय भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी काँग्रेसच्या मानव व माहिती अधिकार विभागाच्या वतीने शिवसेना शाखेत मोफत महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.


या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ठाणे काँग्रेस अध्यक्ष मा.ऍड.श्री.विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात प्रामुख्याने नेत्र चिकित्सा,मोती बिंदू शस्त्रक्रिया,चष्मे वाटप,मधुमेह,ईसीजी,दंत चिकित्सा,हाडांची तपासणी तसेच  सामान्य तपासणी मोफत करण्यात आली.या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की यशवंतराव चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात अनेक प्रकल्प यशस्वी झाले आजही त्यांनी घेतलेल्या निर्णयामूळे शेतकरी,कामगार वर्ग सुरक्षित असल्याचे सांगितले. या शिबिरात काँग्रेस पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.


            

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहर जि काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहर जि काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :   तौक्ते चक्रीवादळामूळे केवळ लोकांच्याच मालमत्तेचे नुकसान झाले नसून अनेक मुक्या प्राणी आणि पक्ष्यांनाही त्याचा फट...

Post AD

home ads