Header AD

युनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज झाले स्वस्त
मुंबई, १ नोव्हेंबर २०२० : युनियन बँक ऑफ इंडियाने ३० लाखांवरील गृह कर्जाकरिता व्याजदर १० बीपीएसने कमी केले आहेत. महिला कर्जदारांना आणखी सवलत मिळणार असून अशा प्रकारच्या कर्जासाठी वरील कर्जापेक्षा आणखी ५ बीपीएस सवलत मिळेल. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गृहकर्जासाठी शून्य प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. यासोबतच युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे कर्जाचा ताबा घेतला गेल्यास १०,००० रुपयांपर्यंतचे कायदेशीर तसेच मूल्यांकन शुल्क माफ केले जातील.


व्याजदरातील या सवलती १ नोव्हेंबर २०२० पासून लागू झाल्या आहेत. कार आणि शैक्षणिक कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. रिटेल आणि एमएसएमईंना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जदरांनी बँकेतील कमी व्याजदाराचा फायदा घेत कर्जाची संधी साधावी अशी बँकेची अपेक्षा आहे.


युनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज झाले स्वस्त युनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज झाले स्वस्त Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads