वीज मीटर कट कराल तर मनसे खळखटयाक करू..मनसेचा वीज वितरण कंपनीला इशारा
डोंबिवली , शंकर जाधव : कल्याण-डोंबिवलीतील मनसेचे आंदोलन महाराष्ट्र राज्यात गाजले आहे. आताहि वाढीव वीज बिलाबाबत मनसेने सरकारला जनतेचा विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या असे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र हुकुमशाहीची राजवट असल्यासारखे हे सरकार लॉकडाऊन मध्ये रोजगार नसताना वाढीव वीज बिले आकारली असून वीज बिल न भरल्यास वीज मीटर कत करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे रोजगार व व्यवसाय नसल्याने आर्थिक ससंकटात सापडलेल्या नागरिकांना एवढे बिल कसव भरणार असा प्रश्न पडला आहे. सामान्य जनतेसाठी लाठ्या-काठ्या झेलणाऱ्या,केसेस अंगावर घेणाऱ्या मनसेने वीज मीटर कट कराल तर मनसे खळखटयाक करू असा इशारा दिला आहे. शुक्रवारी डोंबिवलीतील वी वितरण कार्यालयात मनसेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता ( प्रभारी ) व्यंकटेश सेट्टी यांना निवेदन दिले.
यावेळी उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, कल्याण जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर, जिल्हा संघटक राहुल कामत, जिल्हा सचिव प्रकाश माने,जिल्हा उपाध्यक्ष सुदेश चूडनाईक,महिला सेना जिल्हा अध्यक्षा दीपिका पेडणेकर, महिला सेना जिल्हा अध्यक्षा मंदा पाटील,मनविसे शहर अध्यक्ष सागर जेधे,उपजिल्हा सचिव अनंता म्हात्रे, दिपक भोसले, प्रल्हाद म्हात्रे, गणेश कदम,प्रथमेश खरात, सुभाष कदम, हरी पाटील, अनंता म्हात्रे, नंदू ठोसर, प्रभाकर जाधव, कोमल पाटील, स्मिता भणगे, प्रतिभा पाटील, सुमेधा थत्ते श्रद्धा,किरवे गणेश, मंदार हळबे, सागर जेधे, योगेश पाटील, अरुण जांभळे, तुषार म्हादळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. नऊ महिन्यांपासून आपल्या देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला असून यामुळे राज्यातील आणि देशातील सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मात्र नागरिकांना अवाजवी, वाढीव आणि भरमसाठ विद्युत बिले आकारून नाहक वेठीस धरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी त्यांना आलेली अवाजवी व भरमसाठ बिले लवकरात लवकर भरावी अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असे देखील मंडळाच्या कार्यालयातून नागरिकांना दूरध्वनीवर - भ्रमणध्वनीवर कळविले जात आहे. राज्य शासनाने या अवाजवी बिलाबाबत योग्य निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु नऊ महिने उलटले तरी राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंडळाकडून नागरिकांच्या विचारार्थ कोणताही हितकारक निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो नागरिक भरमसाठ बिलांच्या दबावाने त्रस्त आणि चिंताक्रांत झाले आहेत.
नागरिकांना आकारण्यात आलेल्या अवाजवी व भरमसाठ बिलाबाबत विद्युत मंडळाने आणि राज्य शासनाने योग्य विचार करून लवकरात लवकर नागरिकांना आकारण्यात आलेली भरमसाट व वाढीव बिले कमी करून योग्य दराने बिले आकारण्यात यावीत आणि आर्थिक दृष्ट्या त्रस्त असलेल्या व बिले न भरलेल्या नागरिकांवर मंडळाच्या वतीने कोणत्याही प्रकारचा अन्यायकारक निर्णय किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये. नागरिकांवर अन्याय करण्याचा किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यशासन आणि विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरून नागरिकांना न्याय मिळवून देईल असे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.

Post a Comment