भिवंडीत रेती माफियां विरोधात तहसील दाररांची धडक कारवाई दोन सक्शन पंप गॅस कटरने केले नष्ट
भिवंडी , प्रतिनिधी : राज्य शासनाने रेती माफियांविरोधात कठोर कारवाईचे धोरण अवलंबिले आहे.त्यानुसार तालुक्यातील कशेळी ,दिवे अंजूर, काल्हेर , कशेळी या गावांच्या खाडी पात्रात रेती माफियांकडून सक्शन पंप व लोखंडी बार्जद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसाा करून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास केला जात असल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांना मिळाली असता त्यांनी सोमवारी पहाटे पाच वाजता महसूल विभागातील अधिकारी व पोलिसांच्या साथीने या खाडीपात्रामध्ये धाड टाकून याठिकाणी अवैध रेती उपसा करणारे दोन सक्शन पंपवर कारवाई करून दोन सक्शन पंप गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट केले असून या अवैध रेती उपसा प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान तहसीलदारांच्या या धडक कारवाईने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईत महसूल विभागातील नायब तहसीलदार महेश चौधरी, मंडळाधिकारी खारबाव बी एम टाकवेकर ,अप्पर मंडळाधिकारी भिवंडी चंद्रकांत रजपूत ,मंडळ अधिकारी भिवंडी दत्ता बांबळे, तलाठी राहुल चिकटे ,अविनाश राऊत , गणेश बोडके , बी आर पाटील , योगेश पाटील ,बी एस जाधव , रमेश सूर्यवंशी आदी महसूल पथक सहभागी झाले होते या महसूल पथकामार्फत दोन सक्शन पंप पकडून काल्हेर येथील बंदरावर गॅस कटरने नष्ट केले.तहसीलदार अधिक पाटील यांच्या धडक कारवाईने तालुक्यातील रेती माफियांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
भिवंडीत रेती माफियां विरोधात तहसील दाररांची धडक कारवाई दोन सक्शन पंप गॅस कटरने केले नष्ट
Reviewed by News1 Marathi
on
November 09, 2020
Rating:

Post a Comment