Header AD

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी वर गर्दी न करता यंदा घरी राहूनच अभिवादन करा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई  , प्रतिनिधी  :  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चैत्यभूमीवर लाखोंची गर्दी उसळते.यंदा मात्र  कोरोना महामारीचा प्रसार थांबविण्यासाठी आंबेडकरी जनतेने चैत्यभूमीवर गर्दी न करता घरीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनीचैत्यभूमी येथे  केले. 


राज्य सरकारने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय उशिरा घेतला असला तरी त्या निर्णयाचे रिपाइंने स्वागत केले आहे.मार्च पासून झालेल्या लॉकडाऊन मुळे चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले नव्हते.आता अनलॉक करण्यात आले आहे.सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली असल्याने ना.रामदास आठवले यांनी आज सपत्नीक   चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी सौ.सीमाताई आठवले; कुमार जित आठवले;माजी मंत्री अविनाश महातेकर; रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ;सिद्धार्थ कासारे; नागसेन कांबळे; चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 


 प्रार्थनास्थळांच्या बाहेर पूजा उपयोगी विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा व्यवसाय गेली 9 महिने बंद असून त्यांच्या मदतीचा प्रश्न राज्य सरकार कडे रिपब्लिकन पक्षाने मांडला आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी वर गर्दी न करता यंदा घरी राहूनच अभिवादन करा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी वर गर्दी न करता यंदा घरी राहूनच अभिवादन करा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on November 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads