Header AD

कल्याण डोंबिवलीत १५८ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

 

■५१,५५१ एकूण रुग्ण तर १०२६ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ९७ रुग्णांना डिस्चार्ज...

 


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५८  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ९७  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १५८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५१,५५१  झाली आहे. यामध्ये १२०७ रुग्ण उपचार घेत असून ४९,३१८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३२कल्याण प –  ४९डोंबिवली पूर्व ४९,  डोंबिवली प – ५, मांडा टिटवाळा – ७, तर मोहना येथील ६ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २२ रुग्ण टाटा आमंत्रामधून३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून११ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १५८ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १५८ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads