दिवाळी पहाट ऐवजी रक्तदानाने साजरी होणार पहाट
ठाणे , प्रतिनिधी : दिवाळीची पहिली आंघोळ झाली की पहिली पहाट मित्र-मैत्रीणींसह साजरी करण्यासाठी सगळी तरूणाई ठाण्यातील तलावपाळीला जमा होते. संगीताच्या तालावर आधुनिक ध्वनीयंत्रणा आणि म्युझिकच्या तालावर थिरकणारी तरूण मुले-मुलींना यंदा कोरोनाच्या संकटामुळे हे सेलिब्रेशन करणार नाहीत.
मात्र सध्याच्या काळात सगळीकडे आढळणारी रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबिर दि. १४ नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 7:00 ते ११:०० वा. तर राजावंत ज्वेलर्स समोर, तलावपाळी येथे आयोजित करण्यात आले आहे. दिवाळीच्या दिवसात रक्तदानसारखे महान कार्य करून आपण एखादा जीव वाचवू शकणार आहे.
दिवाळी पहाट ऐवजी रक्तदानाने साजरी होणार पहाट
Reviewed by News1 Marathi
on
November 13, 2020
Rating:

Post a Comment