Header AD

भिवंडीत हुतात्मा स्मारकाचे भूमिपूजन व पशुसंवर्धन मेळावा संपन्न

 भिवंडी ,  प्रतिनिधी  :  तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या मात्र शहरालगत असलेल्या गोरसई सावंदे येथे सन १९८३ रोजी कत्तलखाना बनविण्यात येणार होता मात्र या कत्तल खाण्यास स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला होता . या आंदोलनादरम्यान  १८ नोव्हेंबर १९८३ रोजी झालेल्या गोळीबारात परिसरातील चार तरुणांचा मृत्यू झाला होता . अखेर या आंदोलनाची दखल घेत येथील कत्तलखाना रद्द करण्यात आला होता . या घटनेला बुधवारी तब्बल ३७ वर्ष झाली . या आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणांच्या स्मरणार्थ गावातील नागरिकांनी एकत्र येत गोरसई सावंदे येथे आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या चार तरुणांची आठवण म्हणून हुतात्मा स्मारक उभारण्याचे ठरविले असून या हुतात्मा स्मारकाचे भूमिपूजन बुधवारी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या गोरसई येथील हुतात्मा शुद्धोधन चन्ने, कालवार येथील हुतात्मा शांताराम म्हात्रे , शेलार येथील हुतात्मा चंदर मुकणे , गौरी पाडा येथील हुतात्मा लक्ष्मण हाडके या चार हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हे हुतात्मा स्मारक बांधण्यात येणार आहे.तर याच कार्यक्रमाचे औचित्य साधून जय बजरंग फोर्टी प्लस क्रिकेट संघ गोरसई व टायगर ग्रुप सावंदे यांच्यावतीने या ठिकाणी पशुसंवर्धन मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ख़ासदार कपिल पाटील,उद्योजक रवी पाटील,महादेव घाटाळ , अनंता केणे,माजी आमदार रूपेश म्हात्रे,राष्ट्रवादी तालुक़ा अध्यक्ष गणेश गुळवी, निलेश गुरव,यशवंत गायकवाड,शिवसेना युवा नेता कल्पेश केणे,अरुण पाटील,नगरसेवक राम पाटील, सावंदे सरपंच वनिता भोईर,उप सरपंच चेतन चन्ने आदी उपस्थित होते. 
भिवंडीत हुतात्मा स्मारकाचे भूमिपूजन व पशुसंवर्धन मेळावा संपन्न भिवंडीत हुतात्मा स्मारकाचे भूमिपूजन व पशुसंवर्धन मेळावा संपन्न Reviewed by News1 Marathi on November 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads