भूमिपुत्र कोविड सेंटर बंद करू नये नगरसेवक उमेश पाटील यांची मागणी
कळवा | अशोक घाग : कोणाच्या रुग्णांसाठी दत्तवाडी खारेगाव परिसरामध्ये उभारलेल्या भूमिपुत्र covid-19 सेंटर बंद करू नये अशी मागणी नगरसेवक उमेश पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांना पत्राद्वारे कळवले आहे
कळवा प्रभाग समिती अंतर्गत कळवा-विटावा खारेगाव गणपती पाडा कळवा पूर्व भास्कर नगर वाघोबा नगर महात्मा फुले नगर सह्याद्री सोसायटी घोलाई नगर इंद्रा नगर न्यू शिवाजीनगर सम्राट अशोक नगर जानकी नगर शिवशक्ती नगर या संपूर्ण भागातील लोकसंख्या जवळजवळ दोन ते तीन लाख आहे व भूमिपुत्र कोविड.सेंटर.एकच.आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर भूमिपुत्र कोविड. सेंटरमध्ये दाखल केले जाते यांचा फायदा या या परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होत आहे पण आज हे भूमिपुत्र कोवाड सेंटर बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे नागरिकांना मुंब्रा येथील कौसा किंवा भाईंदरपाडा जाण्यात नाहक त्रास सहन करावा लागेल.
कळवा प्रभाग समिती अंतर्गत रोज 40 ते 50 पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत या परिसरातील स्थानिक नगरसेवकांची व नागरिकांची तसेच सध्या परिस्थितीमध्ये जे रुग्ण उपचार करत आहेत त्यांची अशी विनंती आहे की जोपर्यंत कळवा प्रभाग समिती अंतर्गत कोरोनाच्या. रुग्ण कमी होत नाही व सर्व रुग्ण बरे होत नाही तोपर्यंत खारीगांव येथील भूमिपुत्र कोविड बंद करू नये. अशी मागणी पत्राद्वारे करत आहे.
भूमिपुत्र कोविड सेंटर बंद करू नये नगरसेवक उमेश पाटील यांची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
November 01, 2020
Rating:

Post a Comment