Header AD

भातशेती नुकसान पंचनाम्यापासून शेतकरी वंचित पिडीत शेतकऱ्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांना मिळण्यासाठी निवेदन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  वरप येथील शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे भातशेती नुकसानाचे पंचनामा तालाठी यांनी करून देखील पीक पंचनामा अहवालात शेतकऱ्यांला डावलीत विकासकाच्या आँफिस मध्ये पंचनामा तलाठी यांनी अहवाल पुर्ण  केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर पीक पंचनामा नुकसान भरपाई अवाहालातुन डावलीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात शेतीच्या शासन मदती पासुन वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांना निवेदन देत तलाठी, कर्मचारी यांच्यवर भात शेती नुकसान भरपाई पंचनामा बाबत वंचित ठेवल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यासाठी कारवाई होण्याची मागणी केली आहे.         

                                  

कल्याण जवळील ग्रामीण भागात वरप गावातील १२ एकर १८ गुंठे  कब्जे वहिवाटाच्या  शेत जमिनीत शेतकरी दिलिप भोईर शेती करत आहेत. अवकाळी पावसामुळे भात शेतीच्या नुकसान भरपाईचा पंचनामा करतेवेळी पिकाची पाहणी करताना शेतकरी व पंचाना बोलावून पंचाच्या जबाबाचा उल्लेख अहवालात तालाठी अमूता बडगुजर यांनी न करता विकासकाच्या आँफिसमध्ये बसून पूर्ण केला.  वरील सर्व प्रक्रिया ही जणू हुकूमशाही पध्दतीने पूर्ण केली. त्यामुळे सरकारी मदत मिळाली असती ती मदत मिळण्यापासून मी वंचित राहिल्यामुळे माझ्या हाता-तोंडाशी आलेला घास न मिळाल्याने मी व माझे संपूर्ण कुटुंब आधीच अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीचे नुकसान व झालेल्या अन्यायामुळे आत्महत्येस प्रवूत्त होण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तविली आहे.  

या प्रकरणात लक्ष घालून तलाठी व कर्मचारी यांच्यावर चौकशीचे आदेश देण्यासाठी संबंधितांवर कारवाई होण्या हेतू सहकार्य करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे शेतकरी दिलीप भोईर यांनी निवेदन देत न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.    


 दरम्यान याबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीअवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेती नुकसान भरपाई पंचनामा प्रकरणाची चौकशीआदेश देणार असुन याप्रकरणी दोषी असणारयांवर हक्कभगांची कारवाई मागणी आधिवेशनात करणार असुन  जेणेकरून शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेती नुकसान भरपाई शासन मदतीपासून वंचित राहणार नाही."


भातशेती नुकसान पंचनाम्यापासून शेतकरी वंचित पिडीत शेतकऱ्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांना मिळण्यासाठी निवेदन भातशेती नुकसान पंचनाम्यापासून शेतकरी वंचित पिडीत शेतकऱ्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांना मिळण्यासाठी निवेदन Reviewed by News1 Marathi on November 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads