भिवंडी बायपास रस्त्यावर 5 टन गोमांस जप्त ,प्राणी कल्याण कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे झाली कारवाई
भिवंडी , प्रतिनिधी : प्राणी कल्याण अधिकारी म्हणून गोवंश मांस वाहतुकीस आळा घालण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या यतीन जैन यांच्या सतर्कतेमुळे मुंबई नाशिक महामार्गावरील बायपास रस्त्यावर वडपे चौकी येथे तालुका पोलिसांनी नाकाबंदी करून तब्बल ५ टन गोवंश मांसाची तस्करी करणारा टेम्पो जप्त करण्यात यश मिळविले आहे .
संगमनेर येथून आयशर टेम्पो मधून गोवंश मासाची तस्करी सकाळी होत असल्याची माहिती प्राणी मित्र अधिकारी यतीन जैन यांना खात्रीशीर पणे मिळाल्या नंतर त्यांनी या बाबतची माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील वडपे चौकी येथे दिली असता पोलीस उपनिरीक्षक दाभाडे , पो ना राठोड ,पो हवा सैंदाणे , घोरपडे ,पालवे यांनी मुंबई नाशिक महामार्गावर नाकाबंदी करीत असताना यतीन जैन यांनी वर्णन केलेला टेम्पो येताच पोलिसांनी सतर्कता बाळगून टेम्पो थांबविण्यास भाग पडून चालक कडे वाहनांचा परवाना व कागदपत्रे मागितली असता ती नसल्याचे सांगितले व त्यानंतर टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो मध्ये तब्बल ५ टन गोवंश मास असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चालक अनिल मंडलिक रा.संगमनेर याकडे चौकशी सुरू केली असता या टेम्पो सोबत स्कॉड करून येत इनोव्हा कार मधील मास विक्री साठी घेऊन जाणार मिररोड ठाणे येथील पाकीजा बीफ दुकानाचा मालक कासम अली कुरेशी हा पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली परंतु पोलिसांनी त्यास ताब्यात घ्या आधीच तो तेथून पसार झाला .त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात यतीन जैन यांच्या तक्रारी वरून टेम्पो चालक अनिल मंडलिक , कासम अली कुरेशी व टेम्पो मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले आहे .
भिवंडी बायपास रस्त्यावर 5 टन गोमांस जप्त ,प्राणी कल्याण कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे झाली कारवाई
Reviewed by News1 Marathi
on
November 10, 2020
Rating:

Post a Comment