Header AD

मास्क न लावणा-या 1900 व्यक्तीं विरूद्ध दंडात्मक कारवाई 9 लाख 50 हजारांचा दंड वसूलठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच  मार्केट  या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 1900 व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात आली असून 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली असून यापुढे देखील कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.  


महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी देखील शहरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी  मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढतच आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन यांच्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन आठवड्यापासून विशेष मोहीम घेतली आहे. 


ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये गेल्या २१ दिवसात शहरात विना मास्क फिरणाऱ्या 1900 व्यक्तींविरूद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये  नौपाडा प्रभाग समिती 387, वर्तकनगर प्रभाग समिती 265 , माजिवडा मानपाडा प्रभाग समिती 298, उथळसर प्रभाग समिती 240,  कळवा प्रभाग समिती 187, मुंब्रा प्रभाग समिती 123, लोकमान्यनगर प्रभाग समिती 185, वागळे प्रभाग समिती 95, आणि  दिवा प्रभाग समिती 120 व्यक्तींविरूद्ध कारवाई करून 


एकूण  9 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे...

यापुढे देखील ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये तसेच  मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकांकडून ५०० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. 


मास्क न लावणा-या 1900 व्यक्तीं विरूद्ध दंडात्मक कारवाई 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल मास्क न लावणा-या 1900 व्यक्तीं विरूद्ध दंडात्मक कारवाई 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल Reviewed by News1 Marathi on November 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads