Header AD

ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्तांनी केली घोषणा


■सानुग्रह अनुदानाच्या बाबतीत आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक पार पडली.या बैठकीला उपमहापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेत्या श्रीमती प्रमिला केणी, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, म्युनिसिपल युनियनचे नेते रवि राव आदी उपस्थित होते.ठाणे | प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये 15 हजार 500 इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज केली.या संदर्भात राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेत्या श्रीमती प्रमिला केणी, महापालिका आयुक्त   डॅा. विपिन शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, म्युनिसिपल युनियनचे नेते रवि राव, अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख आदी उपस्थित होते.  


या बैठकीमध्ये महापालिकेच्या कर्मचा-यांना यावर्षी 15,500 इतके सानुग्रह अनुदान 


देण्याचा निर्णय घेण्यात आला.  या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील कायम अधिकारी कर्मचारी 7091, एकत्रित मानधनावरील कर्मचारी 262, शिक्षण विभागाकडील एकूण कर्मचारी 1047 आणि  परिवहन सेवे मधील 1850 कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे.


या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण 16 कोटी इतका खर्च होणार आहे.  सदर सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचा-यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.


ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्तांनी केली घोषणा ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्तांनी केली घोषणा Reviewed by News1 Marathi on November 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

प्रकाश आंबेडकरांनी घेतली एनआरसीच्या आंदोलक कामगारांची भेट

■मी आणि माझे कुंटुंब पुरतेच सरकार मर्यादीत   प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   एनआरसी कामगारांची थकीत देणी म...

Post AD

home ads