अधिकारी संघटनेच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आश्वासन
मुंबई : महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही विद्युत कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ अधिकारी संघटनेला दिले आहे.संघटनेच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संघटनेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) व वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) या पदामध्ये वेतन निश्चितीदरम्यान झालेली अनियमितता दूर करावी. मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) व मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) ही दोन वर्षापासून रिक्त असलेली महत्त्वाची पदे पदोन्नतीद्वारे त्वरित भरावीत.

Post a Comment