ठाणे युवक काँग्रेस माध्यमातून स्वाक्षरी अभियान मोहीम
ठाणे | प्रतिनिधी : केंद्रातील बीजेपी सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी आणि कामगार विरोधी अन्यायकारक काळा कायदा रद्द करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे विधानसभा युवक काँग्रेस माध्यमातून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहिम अभियान सुरु केलेले आहे.
आज काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. प. रामअचल शर्मा यांचे पुत्र प. रणवीर शर्मा चिंटू ठाणे विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस यांनी 25.10.20 विजयादशमीच्या दिवशी लोकांच्या हितासाठी सकाळी 10 वाजे पासून ब्लॉक क्र.1 मनोरमानगर संकर मंदिर येथे सह्यांचा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.कामगार व शेतकरी विरोधी मोदी सरकार विरोधात सह्या करत नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास श्री. राकेश पूर्णेकर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व श्री. स्वप्निल भोईर ठाणे विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष व श्री . श्रीकांत गाडीलकर ब्लॉक क्र. 1 अध्यक्ष काँग्रेस , सुरज राजपूत रवी चौहान , विजेंद्र मिश्रा , आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थितीत होते.

Post a Comment