Header AD

पार्ले अॅग्रोच्या फ्रुट प्लस फिझ पोर्टफोलिओत दाखल झाले आहे नवे क्रांतिकारी पेय 'बी-फिझ'


नवीन मॉल्ट फ्लेवर्ड फ्रुट ज्युसआधारित ड्रिंक ग्राहकांना देणार पेयपानाचा नवा अनुभव सुपरस्टार प्रियांका चोप्रा जोनास आणि ज्यु. एनटीआर ब्रँड अ‍ॅम्बेसिडर्स म्हणून करारबद्ध ....राष्ट्रीय  |  १७ऑक्टोबर  :  भारताची सर्वात मोठी बेव्हरेज कंपनी पार्ले अॅग्रो बी-फिझ हे आपले नवे पेय घेऊन भारतातील बेव्हरेज क्षेत्रात खळबळ माजवून द्यायला सज्ज आहे. अॅपल ज्युसचा आधार असलेले हे अनोखे आणि ताजेतवाने करणारे मॉल्ट फ्लेव्हर्ड कार्बोनेटेड पेय सर्व वयोगटातील ग्राहकांच्या रुचीमध्ये नवी क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे. बी-फिझ हे पार्ले अॅग्रोच्या फ्रुट प्लस फिझ पेयांच्या श्रेणीमध्ये नव्याने दाखल झालेले एक उत्साहवर्धक उत्पादन आहे. या पेयाचे जोरदार मार्केटिंग, बोल्ड पॅकेजिंग आणि आकर्षक किंमत कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक (सीएसडी) श्रेणीमध्ये नवी लाट घेऊन येणार आहेत. या नव्या पेयाची माहिती जास्तीत-जास्त लोकांना व्हावी आणि ते जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ब्रँडने मेगा स्टार प्रियांका चोप्रा जोनासला नॅशनल ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून करारबद्ध केले आहे, तर दक्षिण भारतासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ज्यु. एनटीआर असणार आहे. 


''ड्रिंक फॉर द बोल्ड'' म्हणून ग्राहकांसमोर आणले जाणारे बी-फिझ चवीचा एक आगळावेगळा, बोल्ड आणि उत्साहवर्धक पैलू सादर करणार आहे. 
या उत्पादनाच्या लाँचबद्दल बोलताना पार्ले अॅग्रोच्या जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीएमओ नादिया चौहान म्हणाल्या, ''पार्ले अॅग्रो ही आपल्या ग्राहकांच्या मनाला उभारी देणारा अनुभव देण्याच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आम्हाला रूढ चौकटींना पार करत ग्राहकांमध्ये नवा जोश जागविणा-या चवी व अनुभव बाजारात दाखल करायला आवडते आणि बी-फिझ नेमके हेच करते. त्याचबरोबर आम्ही या उत्पादनाचे मूल्य रु. १० इतकेच ठेवण्याबद्दलही अत्यंत आग्रही आहोत आणि या किंमतीला बाजारात दुसरा पर्याय नाही. आमचे हे उत्पादन आम्ही मर्यादित क्षेत्रामध्ये आधीच दाखल केले आहे व या सॉफ्ट लाँचला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि आता संपूर्ण बाजारपेठेत बी-फीझचा जास्तीत-जास्त ठळक ठसा उमटविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'' 


बी-फिझ ची १६०मिली एसकेयूसाठीची रु. १० ही किंमत अविश्वसनीय आहे. उत्पादनाचे अनोखेपण आणि उच्च दर्जाचे पॅकेजिंग असूनही प्रभावी किंमतीबाबत पार्ले अॅग्रो अत्यंत अतिशय आग्रही राहिले आहे. रु. १० या विक्रीमूल्याच्या ताकदीमुळे आपल्या उत्पादनांच्या वितरणाचा आवाका प्रचंड प्रमाणात वाढविण्यात कंपनीला मोठे यश मिळाले आहे आणि ही उत्पादने पार्ले अॅग्रोसाठी सर्वात वेगाने मोठे होत चाललेली एसकेयू ब्रँड्स बनली आहेत. रु. १० या विक्रीमुल्यामुळे बी-फिझ हे बाजारातील असे एकमेव मॉल्ट फ्लेवर्ड फिझी पेय बनले आहे, जे इतक्या अविश्वसनीय किंमतीला उपलब्ध आहे. 


बी-फिझबद्दल बोलताना ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनास म्हणाली, ''पार्ले अॅग्रोशी माझे नाते फार जुने आहे आणि त्यांचे नवे बेव्हरेज बी-फिझच्या लाँचचा भाग बनण्यासाठी मी उत्सुक आहे. ही मोहीम बोल्ड आहे, धाडसी आहे आणि मजेदारही आहे. या नव्या जाहिरातीसाठी त्यांच्या सोबतीने काम करण्याचा अनुभव कमालीचा होता. फ्रुट आणि फिझ हा पेयांच्या बाजारपेठेतील एक अतिशय रोचक प्रकार आहे आणि माल्ट फ्लेवर्ड बी फिझच्या निमित्ताने त्यात एक आणखी उत्साहवर्धक पेयात भर पडणार आहे. हे पेय लवकरच अनेकांचे लाडके बनेल, याची मला खात्री आहे.'' 

 
खालील दिलेल्‍या लिंक्‍समध्‍ये पार्ले अॅग्रोची बी-फिझ टीव्‍हीसी पाहा:  
प्रियंका चोप्रा जोनास: https://youtu.be/5SGJp2Q1HiI
पार्ले अॅग्रोच्या फ्रुट प्लस फिझ पोर्टफोलिओत दाखल झाले आहे नवे क्रांतिकारी पेय 'बी-फिझ' पार्ले अॅग्रोच्या फ्रुट प्लस फिझ पोर्टफोलिओत दाखल झाले आहे नवे क्रांतिकारी पेय 'बी-फिझ' Reviewed by News1 Marathi on October 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads