Header AD

भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा महिला संपर्क प्रमुखपदी वनिता लोंढे यांची निवड
ठाणे |  प्रतिनिधी  :  भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा महिला संपर्कप्रमुख पदी  वनिता सुयोग लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कोकण विभाग व मुंबई विभाग प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष यांची बैठक आमदार मनीषाताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच मुंबई येथे पार पडली यावेळी वनिता लोंढे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा महिला संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली व आमदार मनीषाताई चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.


यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हरिशचंद्र भोईर,उपाध्यक्ष ऍड मनोज भुजबळ,सचिव अनिल पंडित,कार्यालयप्रमुख हेमंत भास्कर,सदस्य लता पगारे,कोकण विभाग महिला संपर्कप्रमुख योगिता पाटील,आदी सह कोकण विभागातील जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते. वनिता लोंढे यांनी ओबीसी समाजासाठी भरीव असे कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन भाजपाच्या वतीने त्याची हि नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पडून पक्ष संघटन वाढवण्यासाठी निष्टेने प्रयत्न करेल असे यावेळी वनिता लोंढे यांनी सांगितले.
भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा महिला संपर्क प्रमुखपदी वनिता लोंढे यांची निवड भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा महिला संपर्क प्रमुखपदी वनिता लोंढे यांची निवड Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

७३व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मानवतेचा कुंभमेळा संत निरंकारी समागम

कल्याण, कुणाल म्हात्रे   :  मागील ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत  ’ ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम ’  यावर्षी जगाची वर्तमान परिस्थिति लक्षात...

Post AD

home ads