Header AD

ठाणे पोस्ट कोव्हीड सेंटरच्या माहिती साठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहनठाणे  |  प्रतिनिधी  :  कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोव्हीड सेंटर उभारले असून पोस्ट कोव्हीड सेंटरच्या माहितीसाठी नागरिकांनी कक्षाच्या 8657397952 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.


कोरोनामुक्त रुग्णांसाठी अद्ययावत पोस्ट कोव्हीड सेंटर ठाणे महापालिकेच्यावतीने उभारण्यात आले आहे. लोढा लक्झोरिया कॉम्प्लेक्स, माजिवडा येथील महापालिकेच्या अधिनस्त असलेल्या इमातीच्या पहिल्या मजल्यावर हे अद्ययावत पोस्ट कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे.


या ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतरही रूग्णांना जाणवणाऱ्या अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कोरोनामुक्त रूग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच कोरोनाच्या काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ञ, आहारतज्ञ, योगतज्ञ, समुपदेशक, फिजिओथेअरपिस्ट यांच्यासह या सेंटरमध्ये योगा सेंटर, विश्रांती कक्ष तसेच समुपदेशन सेंटर अशा सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


या सेंटरच्या माहितीसाठी नागरिकांना विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.तरी नागरिकांनी कक्षाच्या 8657397952 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

ठाणे पोस्ट कोव्हीड सेंटरच्या माहिती साठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन ठाणे पोस्ट कोव्हीड सेंटरच्या माहिती साठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on October 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads