Header AD

वाहनांच्या अस्तव्यस्त पार्किंगमुळे बाजारपेठेत नागरिकांची चालण्यासाठी कसरत
कल्याण  |  कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालया पासून जवळच असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महंमदआली चौक रस्त्यालगत दुचाकीतीन चाकी, चार चाकी वाहने अस्तव्यस्त पार्क केली जात असल्याने त्यातच रस्त्यावरील वाहनांची वर्दळ व बाजार पेठत येणाऱ्याची गर्दी, तसेच फुटपाथवरील फेरीवाल्याचे बस्तान यामुळे या रस्त्यावरून ये जा करण्यार्या नागरिकांना तारेवरची कसरत करीत ये जा करावी लागत आहे. यामुळे कल्याण वाहतूक शाखामनपाप्रशासन पार्किंगचा विळख्यातुन कशी सुटका करणार असा सवाल उभा राहिला आहे.


कल्याण डोंबिवली मनपाने मनपाक्षेत्रातील काही रस्त्यालगत पी१, पी२, नुसार सम विषम तारेखेनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजुला पार्किंग करण्यासाठी सवलत दिली आहे. तर काही रस्त्यालगत नो पार्किंग झोन तयार केले असुन महासभेकडे धोरणात्मक निर्णय बाबत  धोरण पाठवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पारनाका पर्यंत  पर्यंत पी१, पी२ नुसार पार्किंग बाबत बोर्ड लावुन वाहतुक शाखा याबाबत अमंलबाजवणीकडे लक्ष देते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महंमद अल्ली चौक, ते दिपक हाँटेल, कल्याण रेल्वे स्टेशन समोर जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या पार्किंग बाबत धोरण जाहीर नसल्याने संदर्भीत रस्त्यालगत रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, तीनचाकी, चार चाकी वाहने बेशिस्तपणे पार्किंग होत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होऊन  रस्त्यावरून ये जा करणाऱ्या पंथस्थांना द्रविडी प्रणायम करीत वाटचाल करावी लागत आहे.  


याबाबत कल्याण वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संदर्भीत रस्त्याच्या पार्किंग पाँलीसीबाबत धोरण मनपाने वाहतूक शाखेला कळविण्यात यावे. त्यानुसार पार्किंग धोरणानुसार वाहानावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तर केडीएमसी शहर अभियंता सपना कोळी यांच्याशी संपर्क साधला असता या वाहतूक समस्येबाबत रोडची पाहणी केली असुन संदर्भीत रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्याचे प्रस्तावित असुन  कल्याण वाहतूक शाखेला बाँरीगेट, तसेच पार्किंग धोरणानुसार रस्त्यावर पार्किंग बोर्ड लावणे,तसेच वाहानना लावण्याचे टोचण आदिबाबत प्रस्तावित असल्याचे सांगितले.

वाहनांच्या अस्तव्यस्त पार्किंगमुळे बाजारपेठेत नागरिकांची चालण्यासाठी कसरत वाहनांच्या अस्तव्यस्त पार्किंगमुळे बाजारपेठेत नागरिकांची चालण्यासाठी कसरत Reviewed by News1 Marathi on October 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads