पुरोगामी चळवळीतील ठाण्यातील कार्यकर्त्यांचे महात्मा गांधीजींना अभिवादन
ठाणे | प्रतिनिधी : देशातील ढासळत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना मोठ्या कंपन्यांच्या हाती देणारे कायदे पास केल्यावर, शिक्षणाचे बाजारीकरण करणारे धोरण आणल्यावर, बहुमताच्या जोरावर कामगार विरोधी कायदे संमत केल्यावर आणि उत्तर प्रदेशात होणारे सामूहिक बलात्कार व पोलिसांच्या गुंडा गर्दीमुळे विषण्ण होण्यासारखी परिस्थिती आणि मोदी राज्यात वाढत्या हुकुमशाही मुळे अस्वस्थ कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी ठाण्यातील तलावपाळी येथील गांधीजींच्या पुतळ्याला भेट दिली व गांधी जयंतीच्या दिवशी गांधीजींच्या चिरंतन विचारांचे स्मरण करीत या परिस्थितीत संघर्ष तीव्र करण्याची शपथ कार्यकर्त्यांनी घेतली
सुब्रतो भट्टाचार्य व हेमंतकुमार शर्मा (स्वराज इंडिया), जगदीश खैरालिया आणि अनेक तरुण कामगार (श्रमिक जनता संघ), प्रा डॉ संजय मं गो (जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय), उन्मेष बागवे, अनिल शाळीग्राम, डॉ चेतना दीक्षित (ठाणे मतदाता जागरण अभियान), गिरीश साळगांवकर, सुरेन कोळी (गावठाण कोळीवाडा पाडे संवर्धन समिती), निर्मला पवार (भा महिला फेडरेशन), गिरीश भावे (लोकराज संघटन), एड नीता कर्णिक, प्रा मीनल सोहोनी, हरेश्वर बनसोड, उमाकांत पावसकर आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते

Post a Comment