ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सोलापूर दौरा, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
सोलापूर | प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. अक्कलकोट मधील सांखवी या गावाला त्यांनी भेट दिली. परतीच्या पावसामुळे सोलापुरातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी स्तरावर मंत्र्यांचे दौरे सुरू असून मदत मात्र कोणत्याही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, काहीना मदतीच्या नावावर चार हजार रुपयांचे धनादेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आज या सर्वांनी बाळासाहेबांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सोलापूर दौरा, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
Reviewed by News1 Marathi
on
October 20, 2020
Rating:

Post a Comment