Header AD

चुकीच्या निगेटिव्ह रिपोर्टचा अर्थ समजून घेतानाडॉ. फराह इंगले,डायरेक्टर  इंटर्नल मेडिसीन, फोर्टिस नेटवर्कचे हिरानंदानी हॉस्पिटल वाशी फोर्टिस....


एखादा रुग्ण विषाणूच्या धोक्याच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच; म्हणजे लक्षणे दिसू लागण्यापूर्वी त्याची कोव्हिड-१९ साठी चाचणी करण्यात आल्यास अशा चाचणीमध्ये चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट येण्याची शक्यता असते. याचे कारण अशी व्यक्ती संसर्गबाधित असूनही रिपोर्टमध्ये संसर्ग झाला नसल्याचे दिसून येते, किंवा त्यांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झालेल्या असूनही त्या नसल्याचे निदर्शनास येते. त्याचप्रमाणे चाचणीचा खोटा म्हणजे चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्टही येऊ शकतो, म्हणजे एखादी व्यक्ती संसर्गबाधित नसतानाही ती असल्याचे किंवा शरीरात अँटिबॉडीज नसतानाही त्या असल्याचे दिसून येऊ शकते. 


सामान्यत: विषाणूच्या संपर्कात येण्याचा धोका खूप जास्त असलेल्या व्यक्तींवर, विशेषत: अशा व्यक्तीची लक्षणे कोव्हिड-१९ च्या लक्षणांशी साधर्म्य दाखवणारी असल्यास संसर्ग झाला आहे असे गृहित धरूनच उपचार केले जायला हवेत; याचाच अर्थ रुग्णाला चाचण्यांच्या मर्यादांची कल्पना द्यायला हवी. जर चाचणीसाठी वापरलेल्या स्वॅबवर विषाणूबाधित पेशी चिकटल्या नाहीत, किंवा संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात विषाणूंची पातळी खूपच कमी असेल तर काही RT-PCR चाचण्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळू शकतो. अँटिजेन चाचण्यांचे परिणाम तुलनेने लवकर मिळत असल्याने नर्सिंग होममधील लोक, हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले रुग्ण आणि आरोग्यकर्मी यांच्यासारख्या संसर्गाचा धोका खूप जास्त असलेल्या लोकांसाठी ही चाचणी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या गटांतील व्यक्तींच्या बाबतीतही चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळत असल्याचे यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासांतून दिसून आले आहे. 


संसर्ग झाल्यानंतर चार दिवसांच्या आत SARS-CoV-2 ची चाचणी करून घेणा-या व्यक्तींचे निकाल, त्यांच्या शरीरात विषाणूने प्रवेश केला असूनही निगेटिव्ह येण्याची शक्यता ६७% जास्त असल्याचे संशोधकांनी दाखवून दिले आहे! या पाहणीमध्ये सर्वसामान्य रुग्णांना विषाणूसंसर्ग झाल्यानंतर संपूर्ण आठ दिवसांनंतर त्यांची चाचणी केली गेली (लक्षणे दिसू लागल्यानंतर सरासरी तीन दिवसांनी), पण अशा चाचण्यांचाही चुकीचा पॉझिटिव्ह निकाल आला. जितक्या लवकर लोकांची अचूक चाचणी होईल व त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात येईल तितकेच या विषाणूच्या प्रसारावर अधिक चांगले नियंत्रण ठेवता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 


चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणि चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट हे दोन्ही योग्य नाहीत. चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यास आपल्याला संसर्ग झाला नसल्याचे समजून निश्चिंत झालेली व्यक्ती पुरेशी खबरदारी घेणार नाही, व त्यातून सामाजिक स्तरावर संसर्गाचा धोका वाढेल. लक्षणे दिसून न येणे किंवा लक्षणे दिसली तरीही ती कोव्हिड-१९ ची नसावीत असा समज होणे या दोन्ही कारणांमुळे असा धोका वाढू शकेल. 


संसर्गाची शक्यता अधिक असलेल्या ठिकाणी वावर असलेल्या व आजाराची लक्षणे दिसणा-या एखाद्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तरीही अशा व्यक्तीच्या शरीरात विषाणू आहेत असेच धरून चाललेले अधिक चांगले. दुसरीकडे संसर्गाचे प्रमाण कमी असलेल्या भागांमधील एखाद्या लक्षणे नसलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास ती व्यक्ती सुटकेचा नि:श्वास टाकू शकते. अलीकडेच झालेल्या अनेक अभ्यासांतून चुकीच्या निगेटिव्ह रिपोर्टसचा दर लक्षणीय असल्याचे ठळकपणे सांगण्यात आले आहे, विशेषत: जर चाचणी विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच केली असेल तर असे घडण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकरणांमध्ये विषाणूंची संख्या चाचणीत दिसण्याइतकी जास्त नसल्याने विषाणूंचे अस्तित्व तपासणीच्या साधनांमध्ये पकडले न जाण्याची शक्यता असते. चाचणीच्या सदोष पद्धतीमुळेही विषाणूच्या अस्तित्वाचा पुरावा सुटून जाऊ शकतो. म्हणजे सदोष चाचणी पद्दतीही याला कारणीभूत ठरू शकते. 


कोव्हिड-१९ साठीच्या PCR चाचणीमध्ये कोव्हिड-१९ ला कारणीभूत ठरणा-या SARS-CoV-2 या विषाणूच्या जनुकीय अस्तित्व दिसून येते. SARS-CoV-2 पासून मिळणारे या जेनेटिक मटेरियलची इतर विषाणूंच्या जेनेटिक मटेरियलशी गल्लत करता कामा नये. हे टाळायचे तर कोव्हिड-१९ च्या निदानासाठी विशिष्ट प्रकारची चाचणी करायला हवी. जर ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर ती व्यक्ती संसर्गबाधित असल्याचे खात्रीने म्हणता येते. कोव्हिड-१९ साठीची अँटिजेन चाचणीही अचूक असते व फार क्वचित चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट देते. 


थोडक्यात, चाचणीसाठी नमुना कधी घेतला गेला, रुग्णामधील व्हायरल लोड किती आहे, नमुना पेशी गोळा करण्याची पद्धत, नमुन्याची ने-आण आणि चाचणीदरम्यान वापरले गेलेले रीजन्ट या सर्वांमुळे चाचणीचा निकाल बदलू शकतो व चुकीचा निगेटिव्ह किंवा चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळू शकतो. पण विषाणूच्या संसर्गात आल्यावर, एखाद्या हॉटस्पॉटला भेट दिल्यावर किंवा लक्षणे दिसू लागल्यावर तत्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला चाचणी आणि उपचारांसंदर्भात पुढील मार्गदर्शन देऊ शकतील. 


चुकीच्या निगेटिव्ह रिपोर्टचा अर्थ समजून घेताना चुकीच्या निगेटिव्ह रिपोर्टचा अर्थ समजून घेताना Reviewed by News1 Marathi on October 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads