राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी रत्नागिरीचे जुबेर काझी यांची नियुक्ती
चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल च्या जिल्हाध्यक्ष पदी रत्नागिरी येथील जुबेर काझी यांची नियुक्ती करण्यात आली, या नियुक्ती चे पत्र रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले, तत्पूर्वी या पदी खेर्डी येथील कमाल बेबल कार्यरत होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले असून आता त्यांच्या जागी जुबेर काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, बशीर मुर्तुजा, चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, चिटणीस बंटी वणजू, राजन सुर्वे, नौसीन काझी, रमेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्षा जागृती शिंदे, माजी सभापती पूजा निकम, जि. प. सदस्या दिशा दाभोळकर व सदस्या रिया कांबळे, जयंत शिंदे आदी मान्यवर उपस्थिती होते.

Post a Comment