Header AD

आमदार शेखर निकम यांच्या आमदार कीच्या वर्षपूर्ती निमित्त कोरोना योद्धांचा सन्मानचिपळूण | प्रतिनिधी  : आमदार शेखर निकम यांच्या आमदारकीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कोरोना काळात सेवा बजावणारे ग्रामीणसह शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कामगिरीची दखल घेऊन सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


कोरोना संकट  काळात महत्वपूर्ण  कामगिरी कामगिरी केलेल्या प्रांत, तहसीलदार, आरोग्य विभाग, पंचायत समिती, पोलीस व नगरपरिषद येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये विद्यमान सरपंच, सदस्य, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम कृती दल समिती आदींनाही सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात येणार आहे.


यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती यादव, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, मुख्याधिकारी वैभव विधाते, कामथे रुग्णालय डॉक्टर अजय सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आदींचा  सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शौकत मुकादम, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष चित्रा चव्हाण, महिला शहर अध्यक्ष दीपिका कोतवडेकर,  माजी सभापती पूजा निकम, युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, संचालक सतीश खेडेकर,  जि. प. सदस्य मिनल काणेकर,  रमेश राणे,  नगरसेवक बिलाल पालकर, फैरोजा मोडक,  युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, युवक शहराध्यक्ष सिद्धेश लाड, मनोज जाधव,  सचिन साडविलकर, सचिन पाटेकर,  खालीद पटाईत, नाना भालेकर, ऋतुजा चौगुले, प्रणिता घाडगे, जानवी फोडकर आदी उपस्थित होते.


आमदार शेखर निकम यांच्या आमदार कीच्या वर्षपूर्ती निमित्त कोरोना योद्धांचा सन्मान आमदार शेखर निकम यांच्या आमदार कीच्या वर्षपूर्ती निमित्त कोरोना योद्धांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on October 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads