Header AD

कल्याण डोंबिवलीत २८६ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

 

एकूण ४६,८९९ रुग्ण तर ९२२  जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २८६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या २८६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,८९९ झाली आहे. यामध्ये ३००२ रुग्ण उपचार घेत असून ४,९७५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २८६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५१कल्याण प – ६७डोंबिवली पूर्व ७६डोंबिवली प- ७४ मांडा टिटवाळा – १७तर मोहना येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 


 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४९ रुग्ण टाटा आमंत्रामधून३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून४ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २८६ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  २८६ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads